Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे …. प्रकल्प अहवालाचे सादरीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित मेट्रो विस्तारीकरणासाठी शहरातील लोकप्रतिनिधी व पुणे महा मेट्रोच्या अधिकाऱ्यासमवेत फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भक्ती शक्ती चौक – मुकाई चौक, किवळे – भुजबळ चौक, वाकड साई चौक, जगताप डेअरी – कोकणे चौक, नाशिक फाटा – संत तुकाराम नगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रीक सेंटर, गोडाऊन चौक – चाकण या महत्त्वाच्या मार्गांच्या प्रकल्प अहवालावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस विधासभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर,पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, एन एच आय चे प्रकल्प संचालक संजय कदम, महा मेट्रो संचालक अतुल गाडगीळ, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापू गायकवाड, सुनील पवार, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी नगर सदस्य राहुल कलाटे, शत्रुघ्न काटे, सचिन चिखले यांच्यासह महा मेट्रोचे अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. पुणे (महामेट्रो) यांच्यामार्फत मेट्रो विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विनंतीनुसार सदर प्रकल्प अहवाल महामेट्रोने महानगरपालिकेस सादर केला होता त्यानुसार शहरातील मेट्रो विस्तारीकरणात भक्ती शक्ती चौक – मुकाई चौक, किवळे – भुजबळ चौक, वाकड साई चौक, जगताप डेअरी – कोकणे चौक, नाशिक फाटा – संत तुकाराम नगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रीक सेंटर, गोडाऊन चौक – चाकण या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.

या बैठकीस पिंपरी चिंचवड शहरातील माननीय खासदार, आमदार, सर्व पक्षांचे नेते व पदाधिकारी यांना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करून तांत्रिक, आर्थिक व कार्यान्वयनाशी संबंधित बाबींची माहिती दिली. या प्रसंगी मान्यवरांनी प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत सूचना व मते नोंदविली. यावेळी स्थानिक लोक प्रतिनिधींनी या प्रकल्प मार्गातील काही बदल सुचविले आहेत.

या बैठकीत मेट्रो अलाईनमेंट नाशिकफाटा -भोसरी अशी करण्याबाबत विचार करावा, भोसरीतील सध्याचा उड्डाणपूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्यावा आणि गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिकफाटा ते चाकण पर्यंत करावी व त्याची तांत्रिक पडताळणी ८ दिवसात करावी. तसेच भुजबळ चौक वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोईस्कर असावी, ⁠मेट्रो स्टेशन च्या जवळपास पार्किंग व्यवस्था करण्यात यावी या विषयांवर चर्चा करण्यात आली.
……

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. पुणे (महामेट्रो) यांच्यामार्फत मेट्रो विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. आजच्या बैठकीत शहरातील नवीन मेट्रो विस्तारीकरणाबाबत लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाहीसाठी हा प्रकल्प अहवाल शासनास पाठविण्यात येणार आहे. तसेच यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
—- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
——————

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!