महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :– पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी चिंचवड हि कष्ठकरी ची तसेच उद्योजकांची नगरी आता खेळाडूंची नगरी म्हणून पण निदर्शनास येत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी मधील प्रयोद देवीदास रजपूत ह्याने जळगाव येथील राज्य स्तरीय बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धा कालावधी १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट युथ ह्या गटामध्ये ४७ ते ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी लढत देऊन सुवर्ण पदक पटकावले, तसेच सदर स्पर्धेत उत्कृष्ठ बॉक्सर पारितोषिकाचाही मानकरी ठरला .
प्रयोद देवीदास रजपुत हा श्री. लक्ष्मणभाऊ जगताप कला व क्रीडा अकॅडेमी चा विद्यार्थी असून कोच डॉ राहुल पाटील व संदीप धंदर तसेच पिंपरी चिंचवड बॉक्सिंग असोसीअशन सेक्रेटरी विजय यादव आदर्श मूर्ती प्रेरणा स्थान महागुरू गोपाल देवांग सर ह्यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सराव करत आहे .
तसेच प्रयोद हा सर्व सामान्य वर्गातील खेळाडू आहे आणि वय वर्षे ९पासून बॉक्सिंग खेळत आहे.

प्रयोद सध्या NDA LWS अकॅडेमी मध्ये विध्यार्थी असून राज्य स्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी चा विजेता होणे हे त्याचे लहानपणा पासून धोरण होते आणि गुरुजनाच्या मार्गदर्शनाने त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करता आले त्याची पुढील वाटचाल हीआशियानिवड चाचणी फेरी उपरांत ऑलम्पिक असे लक्ष आहे, त्याच्या पुढील वाटचाली करिता महाराष्ट्र 14 न्यूज च्या हार्दिक शुभेच्छा
यावेळी अनेकांनी असेच पिंपरी चिंचवड उद्योग नगरी मधून अधिक अधिक खेळाडू निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


