Categories: Editor ChoiceSports

पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवीच्या ‘प्रतिक पवार’ ला … ठाणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग 🏋️‍♂️चॅम्पियनशिपमध्ये ‘तीनही’ प्रकारात ‘सुवर्णपदक’!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड मधील नवी सांगवीच्या ‘प्रतिक मधुकर पवार’ याने महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टींग असोसिएशन व जीवनदीप शैक्षणिक संस्था , पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , गोवेली यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या चॅम्पियनशिपमध्ये ‘ पॉवर लिफ्टिंग च्या’ तीनही प्रकारात ५७५ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले आहे. ३० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ठाणे येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पॉवरलिफ्टिंग एक शक्तीचा खेळ आहे तीन लिफ़्टन्सवर तीन वेळा प्रयत्न केले जातात: स्क्वाट, बेंच प्रेस, आणि डेडलिफ्ट मध्ये नवी सांगवीच्या प्रतिक पवार ने सुवर्णविक्रम करत डबल महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा मान मिळविला .

त्याच्या या कामगिरी चे सांगवी-पिंपळे गुरव मध्ये सर्व स्थरातून कौतुक होत आहे, अनेकांनी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या, प्रतिक हा यापूर्वी पॉवर लिफ्टिंगमध्ये आशियाई विजेता आहे. मागील महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या स्पर्धेत बेंच प्रेस प्रकारात त्याला सुवर्णपदक मिळाले होते. जागतिक पॉवर लिफ्टिंगमध्ये भाग घेऊन त्याने देशासाठी पदक आणण्याची त्याची जिद्द आहे. या महिन्यात गोवा येथे १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय बेंचप्रेस पॉवर लिफ्टिंग २०२१ स्पर्धेतही त्याची १२० किलो वजनी गटातून महाराष्ट्रातून निवड झाली आहे.

यापूर्वी ही प्रतीक पवार ने स्टेट, नॅशनल, इंटर नॅशनल आणि आशिया स्पर्धेत उत्तम अशी कामगिरी करुन अनेक सुवर्ण पदक मिळविले आहेत. यापूर्वी ही पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढविल्यामुळे त्याचा आमदार ‘लक्ष्मण जगताप’ आणि महापौर ‘माई ढोरे’ यांनी गौरव केला होता.

ही स्पर्धा जीवनदीप शैक्षणिक संस्था , गोवेली दि .३० व ३१ ऑक्टोबर २०२१ येथे आयोजित केली होती. यावेळी आमदार किसन कथोरे , मुरबाड विधानसभा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी रविंद्र घोडविंदे अध्यक्ष जीवनदीप शैक्षणिक संस्था (गोवेली), संजय सरदेसाई, देवदत्त भोईर, निलेश शेलार अध्यक्ष पॉवरलिफ्टींग असोसिएशन ठा . जि . जि ., विनायक कारभारी, डॉ . के . बी . कोरे प्राचार्य जीवनदीप महाविद्यालय , गोवेली उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

7 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

15 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago