Google Ad
Uncategorized

प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यु मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व जुनिअर कॉलेजच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक – ८ मार्च २०२३) : नवी सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यु मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व जुनिअर कॉलेजच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. परीक्षाचा कालावधी ,सर्वांची धावपळ, पण तरीही वेळात वेळ काढून समस्त स्रीवर्गाचा कार्याचा गौरव करण्यासाठी सदस्या मा.स्वाती पवार मॅडम , व प्रिन्सिपल इनायत मुजावर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सरस्वती पुजनाने कार्यक्रम सुरू झाला.

विश्वात भारतीय संस्कृती आदर्श ठरली ती स्त्रियांच्या अन्यान्य साधारण योगदानामुळे.भारतीय संस्कृतीत स्त्रिया लक्ष्मी ,सरस्वती, दुर्गा, स्वरूपात आदर्श म्हणून प्रत्येक काळात भेटतात. भारतीयांच्या मनात स्रीविषयी सदैव आदराची भावना आहे. या अनुषंगाने स्वाती पवार मॅडम यांनी आपल्या मनोगतातून स्री जीवनाचा जीवनपट उलगडला.आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा.स्वाती मॅडम यांनी महिला कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही गोष्टीत कमी नाही. त्या एकत्र आल्या तर अशक्य ते शक्य करू शकतात.म्हणून महिलांनी पाहिले स्वावलंबी झाले पाहिजे.असा मोलाचा सल्ला दिला. तसेच प्राचार्या इनायत मुजावर मॅडम यांनीही आपल्या मनोगतातून मुलांवर संस्कार करण्यात स्रीयांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही .कारण तीच कुटुंबाचा आधारस्तंभ असते .हे अत्यंत सुंदर रित्या उदाहरणात पटऊन देत आनंदी जीवन जगावे, असे सांगितले.

Google Ad

शेवटी थोडासा विरंगुळा म्हणून सर्व शिक्षक, शिक्षिका,व इतर कर्मचारी मिळून संगीताचा आनंद घेतला. आणि प्रत्येक स्त्री शिक्षिकेला गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. अशा प्रकारे या प्रेरणादायी कार्यक्रमांसाठी संस्थेचे उपाध्यक्ष विजूअण्णा जगताप , सचिव शंकर शेठ जगताप , देवराम पिंजन , व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते . शेवटी आभार ऋषिकेशसर यांनी मानले.अशा प्रकारे थोडक्यात पण आनंदाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!