महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी २०२३) : समर्थ नगर. नवी सांगवी येथे बालकाना योग्य शिक्षण,तसेच मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता वाढवणे, त्यांचे विचार प्रगल्भ करणे,त्यांच्या सुप्त गुणांना वाव देने, त्यांच्या जवळचे कौशल्य वाढवणे, या गोष्टी विचारात घेऊन प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेलियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.
त्यात इयत्ता सातवी ते बारावी चे अनेक विद्यार्थी सहभागी झाले. अशा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.अनिल गायकवाड सर उपस्थित होते. गायक आनंद शिंदे यांचे शिष्य, त्याचप्रमाणे वामनदादा कर्डक यांचा नावाने नुकताच मिळालेला पुरस्कार, गायक, अशा प्रतिभावंत पाहुण्यां सोबतच सौ. दिपाली पवार मॅडम (मास्टर माईंड ड्रॉइंग टीचर )उपस्थित होते. सुरुवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
मा.अनिल गायकवाड सर यांनी मुलांनी ज्या विविध विषयांवर चित्रकलाचे चित्र रेखाटले त्यात मुलांच्या मनातले भाव ओळखून प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढले. आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की मानवी जीवनात रंग आणि कला या किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यातून आपले जीवन जगणे किती सोपे होते, हे विविध रंगाच्या माध्यमातून स्पष्ट केले. त्याचप्रमाणे मा.दिपाली पवार मॅडम यांनी रंगात रंगून कसा जीवनाचा आनंद घ्यावा हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याची दखल घेऊन संस्थेच्या माध्यमातून मुलांमध्ये जे सूक्त गुण असतात , जी प्रतिभा असते यास वाव मिळावा म्हणून, तसेच त्यांचा शारीरिक ,मानसिक, बौद्धिक विकास व्हावा यासाठी कौतुकाची थाप म्हणून त्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट सदस्या मा. स्वाती पवार मॅडम, तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आले. व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा.शंकर जगताप मा.विजय जगताप, सदस्या मा.स्वाती पवारमॅडम, देवराम पिंजन सर उपस्थित होते.
कॉलेजच्या प्राचार्या इनायत मुजावर मॅडम , प्राथमिकच्या मुख्याध्यापिका जयश्री माळी मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी मुलांना शुभेच्छा देऊन सर्वांचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना नेहमी रंगात बुडवणाऱ्या, त्यांच्याकडून वेगवेगळे कला करून घेणाऱ्या स्कूलच्या कलाशिक्षिका अर्चना अधटराव मॅडम,व सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ.रंजना आहेर मॅडम यांनी केली तर सूत्रसंचालन पंकजा पाचरणे मॅडम यांनी करून आभार प्रदर्शन प्राजक्ता पुरोहित मॅडम यांनी केले व शेवटी कार्यक्रमाची आनंदाने सांगता झाली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…