तसेच पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्र.३२-ड सांगवी मधून निवडून आलेले व या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा मध्ये नुकताच प्रवेश करून निवडून आलेले तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांचे कट्टर समर्थक नगरसेवक प्रशांत कृष्णराव शितोळे यांची भाजपच्या गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे. प्रशांत शितोळे यांनी याअगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष पदही भूषविले आहे. त्याप्रमाणे सदर गटाचे मा. विभागीय आयुक्त, पुणे, व मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचेकडे नोंदणी करण्याबाबत ठरविण्यात आलेले आहे. असे पत्र महाराष्ट् भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे. या निवडीमुळे आमदार शंकर जगताप यांच्या गटाची ताकत वाढल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी झालेल्या बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पार्टी गट’ या नावाने अधिकृत गट स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. महापालिकेत भाजपचा सर्वात मोठा गट स्थापन झाल्याने आगामी महापौर, उपमहापौर तसेच विविध स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदी भाजपचेच नगरसेवक नेमले जाणार आहेत हे मात्र नक्की झाले आहे.


















