महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जुलै) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याकडे ४० आमदार असल्याचा दावा केला. तर शरद पवार गटाकडे १९ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पिंपरी चिंचवड शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडून अधिकृत परिपत्रक देखील काढण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी आज जाहीर केली.
या कार्यकारिणीवर श्री. सुनिल विजय गव्हाणे, श्री. इम्रान युनूस शेख, श्री. काशिनाथ संभाजी जगताप, श्री. प्रशांत लक्ष्मण सपकाळ, श्री. देवेंद्र सहदेव तायडे, श्री. मयूर भरत जाधव, श्री. काशिनाथ विठ्ठलराव नखाते, श्री. राजन गोपाळकृष्णन नायर, सौ.शिलाताई संदीप भोंडवे या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…