Google Ad
Editor Choice

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०३जानेवारी) : पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची प्राणज्योत आज मंगळवार सकाळी मालवली. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालाच्या शेजारील गावठाणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी पिंपळेगुरव येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत,पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, आमदार आण्णा बनसोडे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या राहत्या घरी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी जनसागर लोटल्याचे पहायला मिळाले.

Google Ad
Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!