Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथे स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : सोमवारी (दि. २७) सायंकाळी जवळकर नगर, पिंपळे गुरव येथील ‘स्पेशल इफेक्ट स्पा सेंटर’ येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे, तर दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळकर नगर येथे ‘स्पेशल इफेक्ट स्पा सेंटर’ आहे. यामध्ये आरोपींनी दोन महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी आणले होते. त्या महिलांकडून आरोपी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते. यातून मिळालेल्या पैशांवर आरोपी त्यांची चरिथार्थ चालवत होते.

Google Ad

याप्रकरणी एका आरोपी ला अटक करून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत आठ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपाल रमेश मिश्रा (वय ३३, रा. रामनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून या रॅकेटमधील एक महिला (वय २९, रा. हडपसर, पुणे) आणि जुबेर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

24 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!