Google Ad
Editor Choice

थेरगाव येथे अॅक्टीव्हा वरील दोन मुलांना चिरडुन पळुन गेलेल्या बसचे चालकास सिसीटीव्हीचे आधारे शोध घेवुन अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी) : दि .२८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १०.४५ वा सुमारास बारणे कॉर्नर थेरगाव पुणे येथे एका मोटार सायकलवरील दोन इसमांना अनोळखी बसने चिरडले बाबत खबर वाकड पोलीस स्टेशनला प्राप्त झाली . लागलीच वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी असे घटनास्थळी जावुन पाहणी केली असता सदरचे ठिकाणी अॅक्टीव्हा मोटार सायकल वरील दोन इसमांना एका अनोळखी बसने धडक देवून पळुन गेलेचे निदर्शनास आले .

त्यामुळे लगेचच दोघांना उपचारकामी हॉस्पीटल मध्ये पाठविले असता अॅक्टीव्हा मोटार सायकलवरील मागे बसलेला शुभम बबन गायकवाड वय २० वर्षे रा . अश्विनी कॉलनी , ज्योतीबानगर काळेवाडी पुणे हा उपचारापुर्वीच मयत झाला व अॅक्टीव्हा चालक नंदु ज्ञानेश्वर लोखंडे हा गंभीर जखमी आहे असे डॉक्टरांनी कळविले.

Google Ad

या घटनेबाबत वाकड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आला आहे . घटनेचे गार्भीय ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व संतोष पाटील पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागचे अधिकारी सपोनि . संतोष पाटील , सपोनि अभिजीत जाधव , पोउपनि गणेश तोरगल यांना गुन्हा तात्काळ उघडकीस आणुन आरोपी अटक करणे बाबत आदेशीत केले .

सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी पोलिसउपनिरीक्षक , गणेश तोरगल , पोना अतिक शेख , पोना , प्रमोद कदम , पोना . विक्रांत चव्हाण यांचे पथक तयार करुन त्यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या . गणेश तोरगल , अतिक शेख , प्रमोद कदम , विक्रांत चव्हाण यांनी घटनास्थळी गुन्हा घडले ठिकाणची पाहणी केली असता प्रत्यक्षदर्शीकडुन समजले की , सदरचे बसचे खिडक्यांचे खाली पिवळे रंगाचा रेडीयम व त्याखाली निळया रंगाचा पट्टा आहे . त्यावरुन सदरचे पथकाने तपास करणेस सुरुवात केली . सदरचा अपघात रात्रीचे वेळी घडलेला असल्याने सिसीटीव्ही फुटेज पाहणेत अडथळे निर्माण होत होते . तसेच फिर्यादी यांना वाहनाचा नंबर माहित नव्हता . तरी सुध्दा पोउपनि गणेश तोरगल , पोना अतिक शेख , पोना . प्रमोद कदम , पोना . विक्रांत चव्हाण यांनी सदरचे परीसरातील सर्व सिसीटीव्ही फुटेज चेक करुन त्यामध्ये एक संशयीत बस निष्पन्न केली .

सदरची बस ही आदित्य बिर्ला हॉस्पीटल थेरगाव पुणे येथे येणार असलेबाबतची माहीती मिळाली त्याप्रमाणे सदरचे भागात सापळा लावून निष्पन्न झालेली संशयीत बस नजेरत येताच त्यास थांबवून त्यावरील चालक प्रकाश श्यामराव बुरंगे वय २७ वर्ष रा . कुणाल हॉटेलचे मागे , वृंदावन कॉलनी , काळेवाडी पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगीतले की , दि . २८/१२/२०२१ रोजी रात्री १०.४५ वा सुमारास मी माझे ताब्यातील बस नं . एमएच .१४ . एच.जी. ५३६१ ही भरधाव वेगात चालवित नेवुन समोरुन येणारे अॅक्टीव्हा वरील दोन इसमांना धडक दिली होती परंतु सदरचे अपघातानंतर घाबरल्याने तेथून पळुन गेलो असे सांगुन गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास अटक करणेत आली आहे .

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप हे करीत आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!