Google Ad
Editor Choice

सांगवीत चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टीक मुक्त शहर विशेष मोहीम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ मे) : चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टीक मुक्त शहर विशेष मोहीम २५ मे २०२२ ते ११ जून २०२२ कालावधीत राबविणेत येत आहे. मनपाच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आज दिनांक २६/०५/२०२२ रोजी सकाळी ०९.०० ते ११.०० जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास ‘ ह ‘क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन प्लास्टीक मुक्तीकामी जनजागृती पदयात्रेची सुरवात करण्यात आली. पदयात्रा जुनी सांगवी व नवी सांगवी परिसरात घेण्यात आली.

यावेळी ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्याधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरिक्षक चंद्रकांत रोकडे, आरोग्य निरिक्षक उध्दव डवरी, रश्मी तुंडलवार, संजय मानमोडे, सुनिल चौहान, बाबासाहेब राठोड तसेच ह क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी, करसंकलन विभागातील अधिकारी कर्मचारी, विद्युत विभागातील अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच बेसिक संस्थाचे प्रतिनीधी, ग्रीन मार्शल पथक, प्रभाग क्र. ३१ व प्रभाग क्र. ३२ चे आरोग्य विभागातील कर्मचारी, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिक असे मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

Google Ad

यावेळी प्लास्टीकचा वापर टाळणेचे आवाहन करण्यात आले. प्लास्टीक मुक्तीबाबत घोषवाक्यांच्या घोषणा करण्यात आल्या. तसेच साई चौक भाजी मंडई येथे सामूहिक प्लास्टीकचा वापर न करणेबाबत प्रतिज्ञा/शपथ घेणात आली. मंडई परिसरात कापडी पिशवी घेवून येणा-या नागरिकांचा गूलाबपुष्प देऊन ह क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत सन्मान करण्यात आला. इतरांना आपण प्रेरित करत असल्याचे व आपण खूप चांगले काम करित आहात असे क्षेत्रिय अधिकारी श्री विजयकुमार थोरात यांनी कापडी पिशव्यांचा वापर करणा-या नागरिकांना संबोधले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!