कोरोनाचा बिमोड करणाऱ्या पिं. चिं. मनपाच्या वायसीएम रुग्णालयात आता बाहयरुग्णांसाठी ओपीडी सूरू

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. ४ जुन) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात इतर आजार असलेल्या रुग्णांसाठी आजपासुन (०४जून) ओपीडी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांशिवाय इतर आजाराच्या रुग्णांना बाहयरुग्ण सेवा मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट मार्चपासून सुरू झाली होती. तेव्हापासून संपूर्ण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी समर्पित करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला होता. दररोज कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय होती. पिंपरी चिंचवडची कोरोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली होती. अशा परिस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल होऊन बरे झाले आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात आली आहे. अगदी मोजक्या संख्येने आता कोरोना रुग्ण मिळत आहेत. नागरिकही कोरोना नियमांचे पालन करत करीत आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचाराबाबत तसेच कोरोनाचा बिमोड करण्यात वायसीएमचा मोठा वाटा आहे. आता बाहयरुग्णांसाठी वायसीएम रुग्णालयामध्ये ओपीडी सूरू करण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

2 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

2 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

3 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

3 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago