Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं चिं मनपा आयुक्तांनी घेतली स्वीकृत नगरसेवक ‘बिभीषण चौधरी’ यांच्या कामाची दखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५जून) : पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी १५जून रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत ब प्रभाग कार्यालय येथे प्रभाग क्र.१६ व १७ मधील कामकाजाचा आढावा अधिकारी वर्गाकडून घेतला.यावेळी नगरसेवकांच्या प्रभागातील कामाच्या समस्या सोडवण्यात येतील असे सांगितले.

यावेळी स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी यांनी आपल्या प्रभागातील १)गुरूदवार ते वाल्हेकरवाडी मेन रोडला जोडणारा रस्ता २)गुरूदवारची श्रीकृष्ण सोसा.चा रस्ता,डांबरीकरण,एल.ई.डी लाईटचे पोल,३)निसर्गरत्न काॅ. ट्राम वाॅटर,ड्रेनेज व डि.वाय.पाटील ते चिंतामणी चौक प्रलंबीत रस्ता,४)भोंडवे काॅर्नर ते राजयोग पेट्रोल पंप वाल्हेकरवाडी अर्धवट रस्ता असे मागण्याचे निवेदन देवून सविस्तर चर्चा केली.

Google Ad

यावेळी आयुक्त यांनी पाहणी करून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.त्याचबरोबर पाणी गार्डन,नालेसपाई,वाँकिंग रोड हे सुद्धा पूर्ण करू असे सांगितले. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी व नगरसेवक उपस्थीत होते आपल्या मागणीला यश आले.याचे आपणास समाधान वाटले, असे बिभीषण चौधरी(स्विकृत नगरसेवक,ब प्रभाग,पिं.चिं.म.न.पा. यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!