Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापौर उषा ढोरे यांनी केला सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( ३१ जुलै ) : सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंददायी व आरोग्यदायी जावो . तसेच सेवानिवृत्त होणा – या अधिकारी , कर्मचारी यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून माहे जुलै २०२० अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा – या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १७ अधिकारी व कर्मचा – यांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुस्तक , स्मृतीचिन्ह सुपूर्द करुन करण्यात आला , त्यावेळी त्या बोलत होते .

कै.मधुकर पवळे सभागृह , मुख्य प्रशासकीय इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , नगरसदस्य राजेंद्र गावडे , सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर , नगरसचिव उल्हास जगताप , कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे , सरचिटणीस सुप्रिया जाधव , बाळासाहेब कापसे , गणेश भोसले आदी उपस्थित होते . महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये लेखाधिकारी किसन बिडकर , कार्यव्यवस्थापक नारायण पाटील ,

Google Ad

उपलेखापाल अनिल बोथरा , मुख्याध्यापक माणिक किरवे , सरला गिरी , मुख्य लिपिक नंदा केंदळे , दिपक कांबळे , उपशिक्षक वसुंधरा भोसेकर , सुरेय्या शेख , वाहनचालक साहेबराव उपर्वट , सिस्टर इनचार्ज सुरेखा भांडवलकर , विजतंत्री अशोक नाईक , निदेशक राजू कांबळे , मजूर पांडुरंग धोत्रे , अशोक वाघेरे तर स्वेच्छानिवृत्त होणा – यांमध्ये सफाई कामगार कल्पना साळुखे आदींचा समावेश आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

73 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!