Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांचे पिंपरी युवासेनेचे ‘निलेश हाके’ झाले ‘नाथ’ … शालोपयोगी साहित्य देऊन दिला आधार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जून) : कोरोनासंसर्गाने पिंपरी चिंचवड शहरातील अनेक बालकांच्या आई आणि बाबा या दोघांचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या भावविश्‍वातील आई-बाबांची पोकळी कायम राहणार आहे. अशा मुलांसाठी शासनाकडून चांगल्या विविध योजना आखल्या जात आहेत. शासनाकडून मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या बॅंक खात्यात रक्कमदेखील जमा करण्यात येणार आहे. मात्र, छत्र हरपलेल्या या मुलांच्या आई-बाबाचे स्थान कोणीही घेऊ शकणार नाही. या निराधार मुलांना एकट्याला आयुष्याचा संघर्ष करावा लागणार आहे. बालवयात सर्वांत मोठी अडचण असते. ती चांगल्या शिक्षणाची. घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मुलांच्या शाळेचा खर्च कोणी व कसा करायचा? असे अनेक प्रश्‍न नातेवाइकांसमोर असतात. हीच गरज ओळखून पिंपरी युवासेनेचे पदाधिकारी ‘निलेश हाके’ यांनी या मुलांना थोडाफार आधार दिला.

या प्रश्‍नावर मात करण्यासाठी कोरोनाच्या काळात पालकत्व हरपलेल्या शालेय विद्यार्थ्यांना व आश्रमशाळेतील मुलांना शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्ताने पिंपरी युवासेनेच्या वतीने शालेय उपयोगी साहित्याचे वाटप युवासेनेचे पिंपरी युवासेनेचे पिंपरी विधानसभा युवा पदाधिकारी निलेशभाऊ हाके यांच्या वतीने करण्यात आले.

Google Ad

यावेळी पिंपरी युवा सेनेच्या वतीने मा. हिंदुहुद्यसम्राट, शिवसेनाप्रमूख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रमोद गायकवाड व अविनाश जाधव यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. युवा सेना सन्मव्यक रविभाउ नगरकर, युवा सेना उपविधानसभा अधिकारी मा.ओंकार जगदाळे, दिनेश चव्हाण विधानसभा चिटणीस मकरंद कदम,व युवा सेना व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

57 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!