Google Ad
Uncategorized

‘शिवसेनेला पुणे जिल्ह्याला वाली द्या” … पिंपरी युवा सेना युवा पदाधिकारी निलेश हाके यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ जुलै) :शिवसेनेला पुणे जिल्ह्याला वाली द्या भाई” .. पिंपरी युवा सेना युवा पदाधिकारी निलेश हाके यांची मुख्यमंत्र्यांना आपल्या निवेदनाद्वारे भावनिक साद घातल्याचे समजते, 
महाराष्ट्र राज्यात शिवसेना व भाजप युतीचे यशस्वी एक वर्ष साजरे होत असताना पिंपरी चिंचवड शहराला अद्याप न्याय मिळाला नाही. आदरणीय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहरासह मावळतील कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक नंतर खासदार या कारकीर्दीत असलेले आप्पा यांनी जनसेवेच्या माध्यमातून आपला एक ठसा उमटवला आहे.

हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझ्यासह शहरातील सर्व कार्यकर्ते व जिल्ह्यातील सर्व नेत्यांना व कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देऊन त्यांचे हात अधिक मजबूत आणि बळकट करण्यास आपण मदत कराल मध्यंतरी वृत्तवाहिन्यांवरील तुमच्या मंत्री पदाच्या बातम्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत”.

Google Ad

तरी शहरासह जिल्ह्य़ातील गटातटात गुरफटून गेलेली शिवसेना आज आदरणीय आप्पांच्या मार्गदर्शनाखाली शहरात एक वेगळे प्रतिनिधित्व करत असून आपण त्यांना मंत्रिपद देऊन शहरात आणि जिल्ह्यात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना चालना द्यावी. याबाबतचे भावनिक निवेदन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांना दिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!