महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८जून) : पिंपरी युवासेनेच्या वतीने नवनिर्वाचित युवासेनेचेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस मार्गदर्शन करताना मावळ युवासेनेचे विस्तारक राजेश पळसकर म्हणाले की, संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या महानगरपालिकेला सामोरे जायचे. व तसेच नागरिकच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहायचे ज़िल्हा सन्मवयक अनिकेत घुले म्हणाले की “गाव तिथं शाखा आणि शाखा तिथं युवासैनिक “असे धोरण अवलंबून तरुण मतदार युवासेनेकडे जास्तीत जास्त सदस्य करून घ्यायचे.
पिंपरी चिंचवड युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे म्हणाले की, संघटनाच्या नावाला गालबोट न लागता सर्वांनी मिळून काम करायचे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येणाऱ्या निवडणूक मध्ये जास्तीत जास्त युवासेनेचे नगरसेवक निवडून आणायचे.ह्यावेळेस नवनिर्वाचित पद अधिकारी, सन्मवयक रुपेश कदम, माऊली जगताप, सागर शिंदे, मकरंद कदम , ओंकार जगदाळे, बापू चव्हाण,प्रज्वल दिघे,साहिल लोंढे,पराग दिघे,साहिल लोंढे, आशिष बाबर, पुष्पक चव्हाण ह्यांचे सत्कार करण्यात आले.पिंपरी युवासेनाचे पिंपरी विधानसभा सन्मवयक रवी नगरकर ह्यांनी सूत्रसंचालन यांनी केले. कार्यक्रमचे आयोजन पिंपरी युवासेना अधिकारी निलेश हाके ह्यांनी केले होते.

2 Comments