महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ मार्च) : घरफोडी करुन दागीने चोरी करणा-या सराईत महीलेस … पिंपरी पोलीसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. दि. २५ मार्च २०२३ रोजी पोलीस उप-निरीक्षक अनिरूध्द सावर्डे पो.हवालदार बारशिंगे, पो.ना. करपे, पो.ना. बागसिराज, पो.हवालदार भारती, पो.ना. महाडीक, पो.शिपाई शेख, पो. शिपाई रेड्डी असे पिंपरी पोलिस स्टेशन येथे हजर असताना, बारशिंगे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, १५ दिवसांपुर्वी संत तुकारामनगर येथे घरफोडी चोरी करणारी सराईत महीला गुन्हेगार ही पवनेश्वर मंदीर परीसरात फिरत आहे.
अशी बातमी मिळाल्याने सदर माहीती श्री. शंकर आवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, पिंपरी पोलीस स्टेशन यांना कळविली असता, त्यांनी सदर महीलेस ताब्यात घेवुन चौकशी करण्याचे मुफजल आदेश दिल्याने लागलीच वरील स्टाफ सह रवाना होवुन पवनेश्वर मंदीराजवळ जावुन सदर ठिकाणी शोध घेतला असता, बातमिदाराने दिलेल्या माहीतीप्रमाणे एक महीला दिसल्याने तीस पकडुन ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारता तीने आपले नाव मीरा अशोक साठे, वय ३० वर्षे, रा. रूम नं. ४ दुसरा मजला, तिलक हाईटस्, दापोडी, पुणे असे असल्याचे सांगुन तीला अधिक चौकशीकरीता पिंपरी पोलीस स्टेशन येथे आणले असता तीचे ताब्यात काही दागीने मिळाले.
मीरा साठे हिची अधिक कसुन चौकशी केली असता तीने १५ दिवसांपुर्वी संत तुकारामनगर पिंपरी, मागील वर्षी बौध्दनगर, पिंपरी येथे घर फोडुन तसेच दोन दिवसांपुर्वी देहु गाव येथे उघड्या घरात घुसुन सोन्याचे व चांदीचे दागीने चोरी केल्याचे कबुल केले असता तीस पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २७०/२०२३, भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. पोलीस कोठडीदरम्यानचे तपासामध्ये सदर महीला आरोपी कडुन देहुरोड पोस्टे गुरनं १९९ / २०२३ भादंवि कलम ३८० व पिंपरी पोलीस स्टेशन ०२ / २०२२, भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० असे तीन गुन्हे उघड करण्यात आले.
साठे हिच्याकडुन सोन्याचे गंठण, सोन्याचे मंगळसुत्र, मोहनमाळ, झुमके, अंगठी, टॉप्स तसेच चांदीची देवीची मुर्ती, नाणी, पैंजण असा एकुण ११,५७,३८०/-रूपयांचे सोन्याचे व चांदीचे दागीने व ४० हजार रूपयांची दुचाकी मोपेड असा एकुण ११,९७,३८० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. अनिरूध्द सावर्डे पिंपरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…