महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ एप्रिल) : दि. १२/०४/२०२३ रोजी पोलीस अंमलदार २६५७ रेड्डी यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक इसम सध्या चालु असणाऱ्या आयपीएल टी-२० राजस्थान रॉयल विरुध्द चेन्नई सुपर किंग या मॅचवर बेटीग घेत आहे, अशी बातमी मिळताच सदरबाबत ना. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर आवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, पिंपरी पोलीस स्टेशन यांना कळविली असता, त्यांनी सदर इसमास ताब्यात घेवुन कायदेशीर कारवाई करण्याचे मुफजल आदेश दिल्याने लागलीच स्टाफ सह रवाना होवुन पिंपरी मार्केट परीसरात जावुन शोध घेतला.
बातमीदाराने दिलेल्या माहीतीप्रमाणे एक इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव रोशन जितेंद्र मायारामानी, वय २७ वर्षे, रा. कान्हा विहार बिल्डींग, फ्लॅट नं. १४, तिसरा मजला, लस्सी घराचे जवळ, साई चौक, पिंपरी, पुणे असे असल्याचे सांगुन त्याचेकडे अधिक चौकशी करता तो त्याचे जवळील मोबाईल फोनव्दारे चालू क्रिकेट सामन्या दरम्यान, ग्राहकांना दिलेला त्याचा मोबाईल वर ग्राहक कॉल करुन व त्याचे फोनमध्ये असलेल्या ‘क्रिकेट मझा ११’ नावाचे अॅपवर बेटींगचे भाव पाहून ग्राहकांना सांगतो.
त्यांनी बेटींग लावल्यावर ते पुढे त्याचे मालक सनी सुखेजा, वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पिंपरी, पुणे व आशु आसवानी, वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पिंपरी, पुणे यांना कळवित असतो व ते दोघे ग्राहकांनी त्यांचेकडे डिपॉजिट केलेल्या रक्कमेतून बैट लावतात असे सांगीतले असल्याने सदरबाबत कायदेशीर कारवाई करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ), इंडीयन टेलीग्राफ अॅक्ट कलम २५ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीस पकडल्याची माहिती मिळताच त्याचे दोन साथीदार फरार झाले असुन त्यांचा शोध सुरू आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक श्री. अनिरूध्द सावर्डे पिंपरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.