Google Ad
Editor Choice

दापोडी पुल (हॅरीस ब्रिज )येथे नदीपात्रात पडलेल्या इसमाला वाचवण्यात पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांना यश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ एप्रिल २०२२) : दापोडी पुल (हॅरीस ब्रिज )येथे नदीपात्रात पडलेल्या इसमाला वाचवण्यात पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे…

दि.15/4/22 रोजी पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी दापोडी पुल येथे नदीपात्रात एक इसम अंदाजे वय (32)पडल्याची माहिती पिंपरी येथील अग्निशमन दलाला दिली.. घटनेचे गांभीर्य बघता,अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी सदर जवानांना एक इसम नदीपात्राच्या मधोमध गुडघाभर पाण्यात अडकल्याचे निर्दशनास आले.

Google Ad

मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात उतरून सदर इसमाला सुरक्षितपणे नदीपात्राच्या बाहेर काढले.. अंधार असल्या कारणाने बचाव कार्यात अडथळा येत असतांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनीअतिशय कुशलपणे सदर इसमाचा वाचवले*.अग्निशमन दलाच्या जवानांनी पोलिसांना माहिती देत सदर इसमाला रुग्णवाहिकेतून दवाखान्यात रवाना केले. तरी अग्निशमन दलाच्या जवानांचे परिसरात कौतुक होत आहे.


घटनास्थळी अग्निशमन दलाचे फायरमन श्री. सारंग मंगरूळकर, श्री भूषण येवले वाहनचालक श्री. रुपेश जाधव, वाहनचालक श्री. रोकडे, ट्रेनी फायरमन श्री. सिद्धेश दरवेश, श्री.विकास दाभाडे,श्री. सुक्रे, ट्रेनी सब ऑफिसर श्री. अभिजित पाटील, श्री. सिद्धेश बोडके, श्री. चव्हाण आदींनी या रेस्क्यु ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला होता.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!