Categories: Editor Choice

पिंपरीत चिंचवडमध्ये नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरुच … का दिला, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ मार्च) : आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वेध सर्वाना लागेल आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे नव्याने तयार करण्यात आलेली मतदार यादीही नुकतीच जमा करण्यात आली आहे. या सगळ्या काळात  महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सुरू झालेली गळती अजूनही सुरूच आहे

पिंपरी – चिंचवड शहरातील भाजपला धक्क्यांवर – धक्के बसत आहेत . एकामागे एक नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरु असताना आता भाजपच्या जुन्या गटातील निष्ठांवत असलेल्या नगरसेवक रवि लांडगे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिला आहे . रवि लांडगे यांनी म्हटले आहे की , माझे वडील दिवंगत बाबासाहेब लांडगे आणि चुलते दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्याकडून प्रेरणा घेऊन लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षात काम करायला सुरुवात केली .

पिंपरी – चिंचवडमध्ये भाजप रुजवण्यासाठी माझे वडिल आणि चुलते या दोघांनीही फार कष्ट घेतले आहेत . त्यांचे हे कष्ट मी लहानपणी जवळून पाहिले आणि अनुभवले आहे . तेव्हापासूनच माझ्यावर भाजपचे संस्कार रुजले . माझ्या संपूर्ण कुटुंबाचा राजकीय जन्म हा भाजपमधूनच झालेला आहे . मी पक्षात सक्रिय झाल्यापासून पूर्ण समर्पणाने काम केले . पक्षाशी कधी गद्दारी केली नाही . भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम केले . पक्षाच्या जुन्या निष्ठावंतांना ताकद देण्याबरोबरच नवीन कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले . पक्षहित लक्षात घेऊन नवीन आणि जुना असा कधीच भेदभाव केला नाही .

रवी लांडगे म्हणाले, या पक्षात आता माझा राजकीय श्वास गुदमरत आहे, तसेच भ्रष्टाचाराला विरोध करणारे भोसरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची कटकारस्थाने केली गेली . माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाचे बळ कधीच मिळू दिले नाही . भारतीय जनता पार्टी हा पक्ष सत्ताधारी नव्हता त्यावेळी या पक्षात प्रवेश , तर लांबच साधे ढूंकूनही कोणी पाहायला तयार नव्हते . अशावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांनी कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता अत्यंत कठीण काळात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले . पण पक्ष जेव्हा महापालिकेत सत्ताधारी बनला त्यावेळी गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत , तसे अनेकजण बाहेरून आले . आता तर पक्षाचे नेतृत्व बाहेरून आलेल्यांच्याच हातात गेले आहे . निष्ठावंतांवर लादले गेलेले हे बाहेरचे नेतृत्व स्वार्थी आहे , याचा पक्षाच्या नेत्यांना विसर पडला . यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर अनेकदा गाहाणे मांडूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही . पाच वर्ष सतत होणारा अन्याय सहन केल्यानंतर आणि पक्षाचे नेतेही अन्याय करणारांना पाठबळ देत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीतील माझ्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.

रवी लांडगे असेही म्हणाले, मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भोसरीतील धावडेवस्ती प्रभागातून बिनविरोध निवडून आलो . या पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष केला . यापुढेही करत राहणार आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago