Google Ad
Editor Choice Health & Fitness Maharashtra Pimpri Chinchwad

करोना : सण, उत्सवांबाबत अजित पवार यांचे महत्त्वाचे विधान पुढे वाचा !

महाराष्ट्र 14 न्यूज : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या ‘व्हिआयटी’ सभागृहात आढावा बैठक पार पडली. यावेळी अजित पवार यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शासन सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात करोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची काळजी घ्यावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून करोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपस्थित होते.

Google Ad

दरम्यान, करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून संपूर्ण राज्याचा आढावा घेत आहेत तर जिल्ह्यातील स्थितीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार सर्वच पालकमंत्री सध्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करून काम करत आहेत. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारही सातत्याने प्रत्यक्ष फिल्डवर राहून करोना संसर्गाबाबत तपशील घेऊन आवश्यक सूचना देत आहेत. शुक्रवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उभारण्यात येत असलेल्या जंबो कोविड सेंटरच्या कामाची अजित पवार यांनी पाहणी केली. मिशन झीरो पुणे या उपक्रमाचेही उपमुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय करोना संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे स्पष्ट मत त्यावेळीही अजित पवार यांनी व्यक्त केले होते. पुणे शहरानंतर तिथून अजित पवार आपल्या मतदारसंघात पोहचले आहेत. तिथे आज त्यांनी करोना स्थिती व अन्यबाबतीत माहिती घेतली व प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी विस्ताराने चर्चा केली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!