Google Ad
Editor Choice

डिन हटाव वाय.सी.एम.एच बचाव” … या घोषणेसह वैद्यकीय अधीक्षक यांचे निलंबन करण्याची पिंपरी – चिंचवड युवा सेनेची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मन हेलावून टाकणारी घटना घडली शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व अंदाधुंद कारभारामुळे मृतदेहाची अदलाबदल झाली संतप्त नातेवाईकांनी याबाबत जाब विचारत तक्रार करण्यासाठी वैद्यकीय अधिक्षकांकडे धाव घेण्यात आली. परंतु वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर वाबळे यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे मिळाली याचा अर्थ वैद्यकीय अधीक्षक या प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे दिसून आले असल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे.

Google Ad

यापूर्वीही रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेमध्ये सुद्धा काही प्रमाणात निष्काळजीपणा कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा दिसून आला. परंतू सदर बाब अतिशय गंभीर असून सबंध महाराष्ट्रातून या घटनेचा तीव्र निषेध होत असून त्याबाबत आपण दोषी कर्मचाऱ्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाबळे यांचे त्वरीत निलंबन करण्यात यावे याबाबतची मागणी अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांच्या वतीने करण्यात आली.

त्याप्रसंगी चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, पिंपरी उपविधान सभा अधिकारी अविनाश जाधव , नितिन पाटिल युवासेना समन्वयक चिंचवड विधानसभा,राजेश पाटिल, विशाल भातंबरेकर, सैपन मुजावर, निजाम मुजावर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!