Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

हत्याकांडाने पिंपरी चिंचवड हादरलं … भरदिवसा धारदार शस्त्राने सपासप वार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२जुलै) : पिंपरी चिंचवडच्या चिखली भागात भर दिवसा धारदार शस्त्राने वार करत एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. कानिफनाथ क्षीरसागर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आरोपी आकाश जाधवने पीडित कानिफनाथ क्षीरसागरला रविवारी (११जुलै) दुपारच्या सुमारास मंडप बांधायचं काम द्यायचं आहे असं सांगून त्याला एकांत स्थळी बोलवलं. त्यानंतर तो एका व्यक्तीशी बोलत असताना आरोपी आकाशने त्याच्यावर सपासप वार करत त्याची हत्या केली.

पीडित कानिफनाथ क्षीरसागर आपल्या मुलासह एका व्यक्तिशी बोलत होता. तेवढ्यात आरोपी आकाश जाधव हातात पिशवी घेऊन आला, पिशवीतून धारदार शस्त्र काढून कानिफनाथवर सपासप वार केले. हल्ला झाल्यानंतर कानिफनाथ तेथून पळून गेला. मात्र, आरोपी आकाश जाधव त्याच्या मागे पाठलाग करुन हल्ला सुरूच ठेवला. क्षीरसागर पळत गेल्यानंतर जाधवने दगडाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची हत्या केली.

Google Ad

काही दिवसांपूर्वी आरोपी आकाश जाधववर काही जणांनी हल्ला केला होता. तो हल्ला कानिफनाथच्या सांगण्यावरून केल्याचा आरोपीला संशय होता. त्यामुळे त्याने या हल्ल्याचा बदला म्हणून कानिफनाथची हत्या केल्याचा दावा आरोपी आकाशने पोलिसांकडे केलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी आकाश जाधवला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

99 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!