Google Ad
Uncategorized

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ ऑगस्ट) : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. उत्कृष्ठ सेवेसाठी हे पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण सेवा, विशेष कामगिरी याबद्दल ही पदके दिली जातात.

यावर्षी देशभरातील २२९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रातील ३३ जणांचा समावेश आहे, तर ६४२ जणांना उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात महाराष्ट्रातील ४० जणांचा समावेश आहे.

Google Ad

देशभरातील ८२ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रातील तीन अधिकारी आहेत. अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पिंपरी-चिंचवचडे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!