पिंपरी चिंचवड स्थायीची सुसाट एक्सप्रेस … शहरातील विविध विकासकामांवर कोटींच्या कोटी उड्डाणे!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( २२ फेब्रुवारी २०२१ ) : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे २७० कोटी ४६ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
वाकड येथील नव्याने ताब्यात आलेल्या रस्ते विकसित करण्याकामी ४२ लाख रुपये खर्च होणार आहे. पठारे मळा, बुर्डे वस्ती, काळजेवाडी परिसर आणि च-होली परिसरात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ९५ लाख रुपये खर्च होणार आहेत.


रहाटणी परिसरातील रस्त्यांवरील दिवाबत्ती पोल बदलण्यासाठी ९२ लाख रुपये खर्च केले जातील. चापेकर चौक ते मोरे हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता अर्बन डिझाईन नुसार विकसित करण्यात येणार असून यासाठी ५ कोटी ८२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
भोसरी स्मशानभूमी ते अग्निशामक केंद्रापर्यंतचा रस्ता तसेच भोसरीमधील बापूजीबुवा चौक ते पीएमटी चौकापर्यंतचा रस्ता आणि प्रभाग क्र. ८ मधील यशवंतराव चव्हाण चौक ते विश्व्वेश्वर चौकापर्यंतचा रस्ता अद्यावत करण्यात येणार आहे. यासाठी ७७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
संभाजीनगर, शाहूनगर आणि इतर परिसरात जलनिःसारण विषयक सुधारणाकामे आणि नलिका टाकण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च होतील. अ, ब, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जलनिःसारण नलिकांविषयक कामांसाठी ३ कोटी ६८ रुपये खर्च केले जाणार आहेत. सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण विषयक कामांसाठी ९० लाख रुपये खर्च होणार आहेत.
बिर्ला हॉस्पिटल पासून वाल्हेकरवाडी पर्यंतचा रस्ता, दोन्ही बाजूंनी पदपथ तसेच सायकल ट्रॅक करण्यासाठी २० कोटी ५५ लाख रुपये खर्च केले जातील तर भोसरीतील चांदणी चौक ते लांडेवाडी महाराष्ट्र बँकेपर्यंतचा रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्यासाठी ३५ कोटी ९७ लाख रुपये खर्च केले जातील.  प्रभाग क्र. ८ मधील संकेत हॉटेल ते मराठा चेंबर्स पर्यंतचा रस्ता अद्यावत पद्धतीने विकसित करण्यासाठी २७ कोटी ६२ लाख रुपये खर्च होणार आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

20 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago