Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या ६४९७.०२ कोटी रुपयांच्या सन २०२२-२३ च्या  मुळ अर्थसंकल्पास प्रशासक राजेश पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत  अंतिम मंजुरी

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. २९  मार्च २०२२) :  सन २०२१-२२ चे सुधारीत आणि महापालिका, केंद्र सरकार आणि राज्य शासन यांच्या योजनेसह ६४९७.०२ कोटी रुपयांच्या सन २०२२-२३ च्या  मुळ अर्थसंकल्पास प्रशासक राजेश पाटील यांनी आज झालेल्या बैठकीत  अंतिम मंजुरी दिली.

प्रशासक राजेश पाटील यांनी अर्थसंकल्प मंजुरी आणि माहे फेब्रुवारीमधील सर्वसाधारण सभेतील तहकूब विषयांबाबत आज बैठक घेतली.  पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या बैठकीमध्ये  मुख्य वित्त व लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी सन २०२१-२२ चे  सुधारीत आणि  सन २०२२-२३ चे  मुळ अंदाजपत्रक प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे सादर केले. बैठकीस नगरसचिव उल्हास जगताप यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, मुख्य लेख परीक्षक प्रमोद भोसले, सहशहर अभियंता श्रीकांत सवने, रामदास तांबे, संजय कुलकर्णी, संदेश चव्हाण, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, उप आयुक्त अजय चारठाणकर,मनोज लोणकर, संदीप खोत, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण  गोफणे, वायसीएमचे अधिष्ठाता डॉ राजेंद्र वाबळे यांच्यासह   सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.

औंध येथील  सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल बांधकामासाठी २ कोटी रुपये निधी उपआयुक्त, पशुसंवर्धन, पुणे यांच्या नावे अदा करण्यास तसेच सुपर स्पेशालिटी व्हेटेरिनरी हॉस्पिटल औंध या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून एक डॉक्टर व एक प्रतिनिधी ठेवण्यास आणि  भोसरी या ठिकाणी पाळीव प्राणी, जनावरे यांचेसाठी अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यास प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.

शहरातील रस्ते, मंडई व इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे कामकाजा करिता तयार करण्यात आलेल्या निविदा आरएफपी नुसार ७ वर्षे कालावधीकरिता निविदा प्रक्रिया राबविणेकामी व त्यापोटी होणा-या अंदाजे ३६२.०४ कोटी रुपयांच्या  अथवा प्रत्यक्ष खर्चासदेखील प्रशासक पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली.

स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना देखील प्रशासक पाटील यांनी आज मंजुरी दिली. यामध्ये तरतुद वर्गीकरण, वायसीएम रुग्णालयामधील तात्पुरत्या स्वरूपातील मानधनावरील निवड झालेल्या निवासी उमेदवारांच्या नियुक्तीस कार्योत्तर मान्यता आदी विषयांचा समावेश होता.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago