महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जुलै) : व्यक्ती कितीही मोठा आणि दिग्गज असला तरी नियम सर्वांनाच सारखे असतात, याचाच प्रत्यय नुकताच पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरवच्या काटेपुरम चौकात एका घटनेतून आला आहे. हिमांशू जैन यांचे काटे पुरम येथे अंबे इलेक्ट्रिकल दुकान असून त्यांनी दुकानातून निघणारा कचरा महानगरपालिकेच्या घंटा गाडीत न टाकता तो सार्वजनिक रस्त्यावर टाकला ही गोष्ट आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली.
सांगवी विभागाचे आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तोच कचरा गोळा करून संबंधित दुकानात पुन्हा टाकला आणि सांगवी पोलिस ठाण्यात केलेल्या कृत्याबद्दल संबंधितांवर सार्वजनिक ठिकाणी घाण करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा कलम ११५ ग/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांनी फिर्याद दिली आहे.
या कारवाई वेळी अभिजित हाराळे क्षेत्रिय अधिकारी रमेश भोसले सहाय्यक आरोग्य अधिकारी मुकादम विकास कांबळे आरोग्य कर्मचारी सिद्धार्थ जगताप, विनोद कांबळे उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…