महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मार्च) : पिंपळे निलख येथील रक्षक चौकात बीआरटीएस रस्त्यालगत मिलीटरी हद्दीत १०० फूट उंच भारतीय ध्वज तिरंगा फडणवण्यासाठी ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे, या ध्वजस्तंभाचे भोवती सुशोभीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सदर काम लवकर पूर्ण करावे, आणि नागरिकांना ठराविक वेळेत पाहण्यासाठी हा परिसर खुला करावा अशी सूचना लष्कराच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी यांना देण्यात आली आहे.
तमाम भारतीयांना तिरंगा ध्वजाचा अभिमान त्यामुळे
औंध मिलिटरी कॅम्प येथील भारतीय लष्करातील जवान आणि स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून रक्षक चौक येथे तिरंगा उभारावा, आणि त्याचे सुशोभीकरण करावे अशी मागणी होत होती.