Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका खुल्या बाजारातून कर्जरोखे उभारण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेडची अशी घेणार मदत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . ९ जून २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर विकासाच्या अनुषंगाने विविध प्रकल्प करण्याचे नियोजित आहेत . सदर प्रकल्प उभारण्यासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करावा लागणार आहे . यासाठी महापालिका रोखे , कर्जरोखे या बाबींचा विचार करीत होती . महापालिकांना विकास कामांसाठी रोखे , कर्जरोखे उभारण्यासाठी येणा – या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने केंद्र शासनाने तांत्रिक सल्लागार म्हणून काही मर्चेट बँकर किंवा फंड अरेन्जर यांची नियुक्ती केली आहे .

त्यामध्ये एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड यांचा मर्चेट बँकर म्हणून समावेश आहे . मर्चेट बँकर महापालिकांना भांडवली बाजारातून रोखे जमा करण्यासाठी व त्यासंबंधित सर्व कामांमध्ये सहाय्य करतात . तसेच ते महापालिकांना विश्वस्त , निबंधक , कायदेशीर सल्ला इत्यादींच्या नियुक्तीसाठी सहाय्य करतात .

Google Ad

त्याअनुषंगाने खुल्या बाजारातून कर्जरोखे उभारण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड यांचेकडून महापालिकेस पत्र प्राप्त झाले होते . सबब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शहर विकासाच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांसाठी आवश्यक कर्जरोखे उभारण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड यांची मर्चेट बँकर म्हणून नेमणूक करणेस स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!