पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत …’ पिंपरी चिंचवडकरांचा निर्धार – करुया कोरोना हद्दपार ‘ या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . १४ ऑक्टोबर २०२० ) : कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित होणा – या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे . मात्र कोरोनाच्या समुळ उच्चाटनाची लढाई अजुन आपण पुर्णपणे जिंकलेली नसुन आगामी काळात एकजुटीने प्रयत्न करुन कोरोनाला कायमचे हद्दपार करण्याचा संकल्प करुया असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत आज ‘ पिंपरी चिंचवडकरांचा निर्धार – करुया कोरोना हद्दपार ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , आयुक्त श्रावण हर्डीकर , नगरसेवक शशिकांत कदम , अंबरनाथ कांबळे , संतोष कांबळे , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे , महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डांगे , सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे , संदिप खोत , स्मिता झगडे , आशादेवी दुरगुडे , सामाजिक कृती दलाचे डॉ.सुभाष साळुखे यांच्यासह अधिकारी , कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते .

प्रारंभी पिंपरी चिंचवड शहराच्या जडण घडणीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .

महापौर माई ढोरे म्हणाल्या , कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासुन सर्वजण झटत आहे . माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातुन जनजागृती आणि सर्वेक्षणाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु आहे . मात्र अजुन कोरोना पुर्णत : हद्दपार झाला नाही . नागरिकांनी मास्कचा वापर , शारिरीक अंतर , सॅनिटायझरचा वापर करणे आदी सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे . आता दसरा सण येत आहे यात महिलांचा सहभाग जास्त असतो . कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी आपण साधेपणाने सण साजरे करावेत . गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि गर्दी करणे टाळणे आवश्यक आहे . कोरोना मुक्त शहर करण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन यावेळी महापौर ढोरे यांनी केले .

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले , माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्व्हेक्षणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे . कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी कोणीही कोरोना पुर्णपणे गेला असा समज करुन घेवु नये . या आजाराच्या संक्रमणाचा धोका अद्यापही कायम आहे त्यामुळे गाफिल न राहता आपण कोरोना विरुध्द लढा द्यायचा आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका राज्यातील सर्वात चांगले काम निश्चित करेल . लोक सहभागातुन कोरोना मुक्तीची मोहिम आपण यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास ढाके यांनी यावेळी व्यक्त केला .

पिंपरी चिंचवडचा निर्धार – कोरोना हद्दपार मोहिमे अंतर्गत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपस्थितांना ‘ आमचा निर्धार – कोरोना हद्दपार ‘ या संकल्पाची शपथ दिली . सहा महिने अतिपरिश्रम करुनही कोरोना आजार आपल्या शहरातुन गेलेला नाही . आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सर्व सदस्य , अधिकारी आणि कर्मचारी निर्धार करतो की , आम्ही मास्कचा वापर नेहमी व यथायोग्य पध्दतीने करणार . एकमेकांपासुन शारिरीक अंतर आणि मानसिक जवळीक राखणार . गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि गर्दी करणे टाळणार . कोरोना आजारा बद्दल इतरांना प्रेमाने समजुन सांगणार . अशी शपथ आज घेण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले .

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago