पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय समित्यांच्या निवडणुका ऑनलाईन … मिळणार नवीन कारभारी!

 

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी – चिंचवड महापालिकेतील झालेल्या विषय समित्यांच्या बरखास्त झाल्याने निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे . त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे . त्यानंतर सभापतिपदाची निवडणूक होईल . तर , प्रभाग समिती बरखास्त होत नसल्याने अघोषित मुदतवाढ मिळालेल्या आठ प्रभाग समिती अध्यक्षांचीही निवडणूक लवकरच घेण्यात येणार आहे .

पिंपरीचिंचवड महानगरपालिकेतील कला व क्रीडा व सांस्कृतिक समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा, या समित्यांची मुदत १४ जून राजी संपली आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढील आदेशापर्यंत विषय समित्यांच्या नवीन नेमणुका करू नयेत , असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता . त्यामुळे विधी , शहर सुधारणा , महिला आणि बालकल्याण , कला , क्रीडा , सांस्कृतिक या चार विषय समित्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ १४ जून २० रोजी संपल्याने समित्या बरखास्त झाल्या होत्या .

त्यांनतर कार्यकाळ संपल्यानंतर शिक्षण समितीदेखील बरखास्त झाली होती . या समित्यांचे अधिकार महासभेकडे गेले होते . आता निवडणूक घेण्यास राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे . त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत विषय समितीच्या सदस्यांची निवड होऊन या समित्या अस्तित्वात येऊ शकतील , व त्यानंतर समितीच्या अध्यक्ष पाडाची निवड केली जाणार आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago