Google Ad
Editor Choice Education Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेवू नये … शिक्षण विभागाचे पालकांना आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जून) : पिंपरी चिंचवड शहरातील शाळा संस्थाचालक व पालकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात येते की , सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील काही खाजगी प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असून यापुर्वी सदर शाळांना शाळा बंद करणेबाबत शिक्षण विभागाने नोटीसही दिलेल्या होत्या .

असे असतानाही पिंपरी चिंचवड शहरातील या शाळा अनधिकृतरित्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत . पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित पालकांना शिक्षण विभागाच्या वतीने कळविणेत येते की , त्यांनी आपल्या पाल्यास या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेवू नये . या अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास , त्यांच्या पाल्याच्या होणा – या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत : जबाबदार राहतील .

Google Ad

महानगरपालिका शिक्षण विभागाने संबंधित शाळा चालकास कळविले आहे की , त्यांनी शासन परवानगी घेऊनच शाळा सुरु कराव्यात . अनधिकृतपणे शाळा सुरु केल्यास किंवा चालू ठेवल्यास दिनांक १९ / ०६ / २०१० अन्वये त्यांचे विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल , याची संबंधित शाळांनी नोंद घ्यावी .

▶️या आहेत शहरातील अनाधिकृत खाजगी शाळा :

१ ) ग्रंट मीरा इंग्लिश मिडीयम स्कुल , कुदळवाडी – इंग्रजी
२ ) मास्टर केअर इंग्लिश स्कुल , भोसरी – इंग्रजी
३ ) ज्ञानराज प्राथमिक शाळा , कासारवाडी- मराठी
४ ) ज्ञानसागर इंग्लिश स्कुल प्राथमिक ) चिखली – इंग्रजी
५) मॉर्डन पब्लिक स्कुल , रहाटणी- इंग्रजी
६) एम.एस. स्कुल फॉर किड्स , सांगवी – इंग्रजी

असे ज्योत्स्मा शिंदे प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

78 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!