Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात पाहणी करून स्थापत्य आणि आरोग्य विभागाशी संबंधित कामे दिवाळी पूर्वी प्राधान्याने पूर्ण करून घ्यावीत – महापौर उषा उर्फ माई ढोरे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २९ सप्टेंबर २०२१) : क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपआपल्या क्षेत्रात पाहणी करून स्थापत्य आणि आरोग्य विभागाशी संबंधित कामे दिवाळी पूर्वी प्राधान्याने पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिल्या.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशाकीय इमारती मध्ये आयुक्त कक्ष येथे आयोजित आरोग्य व स्थापत्य विषयक विकास कामांबाबत आढावा बैठक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, स्थायी समिती सभापती अॅड.नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी के.अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सर्व क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, ज्या ठिकाणी शहरात सिमेंटच्या रस्त्याचे काम चालू आहे. तसेच पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या बाजूला स्ट्रॉम वाटर लाईन वर असणारे चेंबर हे रस्त्याच्या उतारा बरोबर समतल नाही अशा ठिकाणी पावसामुळे चिखल होऊन पाणी साठत असल्याचे निदर्शनास येत असून ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. रस्ता दुरुस्ती संबंधी पॅच वर्क चे कामकाज करत असताना व्यवस्थित होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी चेम्बंर्स खोदलेले आहेत ती कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे सांगून संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दिवाळी पूर्वी कामे पूर्ण करावीत, अशा सूचना प्रशासनाला दिल्या.

तसेच अस्वच्छता आढळून येणाऱ्या परिसरातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील या वेळी बोलताना दिल्या. या बैठकीत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, शहरातील मोकळ्या जागेवर कचरा टाकला जातो. डी.पी बॅाक्स जवळील व रस्ता दुभाजकाजवळील वाढलेले गवत, कचरा लवकर काढला जात नाही. महावितरण विभागाशी समन्वय साधून कामे करून घ्यावीत. रस्त्याची कामे करताना व डांबरीकरण करताना चेंबरची पातळी समान करून घ्यावी. क्षेत्रीय स्तरावर सर्वे करून लवकरात लवकर दुरुस्तीचा अहवाल द्यावा असे हि त्यांनी सांगितले. तसेच अनधिकृत फ्लेक्स, झाडांवर डीपी बॉक्सवर अनधिकृत जहिराती लावल्या जातात त्यावरही कारवाई करण्यात यावी.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले शहर स्वच्छ व सुंदर करावयाचे आहे यासाठी स्वच्छतेला प्राधान्य देणार असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दररोज प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून, स्वच्छते विषयक तसेच स्थापत्य विषयक कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. तसेच साफसफाईच्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी त्याचा नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना आरोग्य विभागास या वेळी देण्यात आल्या. आठ प्रभागांसाठी आठ तपासणी पथक तयार करून साफसफाई कामाबाबत तपासणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!