Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोविड-१९ लसीकरण अपडेट्स

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .१२ जून २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय १८ ते ४४ वर्षे वयोगटातील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा – या विद्यार्थ्यांनी आवश्यक वैध पुराव्यानिशी मी जबाबदार अॅप वर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम दि .१२ जून २०२१ रोजी नवीन जिजामाता रुग्णालयात राबविण्यात आली .

सदर मोहिमेमध्ये मी जबाबदार अॅप वर नोंदणी केलेल्या २२ ९ लाभार्थ्यांपैकी प्रत्यक्ष लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर ६४ लाभार्थी उपस्थित होते यामधील २१ लाभार्थी अपात्र होते व पात्र ४३ लाभार्थ्यांना आज लसीकरण करण्यात आलेले आहे . तसेच आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणा – या अधिकारी व कर्मचारी यांचे साठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली . सदर मोहिमेमध्ये २४४ लभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले .

Google Ad

तसेच उद्या रविवार दि .१३ जून २०२१ रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहतील .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!