Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला उशिरा सुचले शहाणपण … या, भांडवली खर्चात करणार बचत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पेविंग ब्लॉक ची कामे केली जातात यामध्ये जुने ब्लॉक बदलून नवीन ब्लॉक बसवणे, करड्या रंगाचे ब्लॉक बदलून रंगीत ब्लॉक बसवणे, अर्बन स्ट्रीट /स्मार्ट सिटी संकल्पनेनुसार जुने ब्लॉक बदलून शॉट ब्लास्टेड/ टेकटाईल इत्यादी पद्धतीचे ब्लॉक बसविणे यांचा प्रामुख्याने अंतर्भाव दिसून येतो व सदरची कामे करताना मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च होत असतो.

विविध महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये पेविंग ब्लॉक बसविणे चे प्रमाण अत्यल्प करून त्याऐवजी काँक्रीटचा वापर करण्यावर भर देण्याचे प्रयोजन राबविले आहे. त्यामुळे त्यांच्या भांडवली खर्चावर येणारा ताण कमी होत असल्याने पेविंग ब्लॉक चा वापर कमी करणे बाबत तेथे काय उपाययोजना केल्या जात आहेत? याचा अभ्यास करून, पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये यापूर्वी बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक्स चा खर्च तसेच त्यावर होणारा देखभाल-दुरुस्तीचा वार्षिक खर्च ह्या बाबी विचारात घेऊन नवीन पेव्हर ब्लॉक्स ची कामे न करता त्याऐवजी आवश्यकतेनुसार अंतर्गत छोटे रस्ते कॉंक्रिटीकरण करणे फायदेशीर राहणार आहे.

Google Ad

सबब, यापुढील 3 वर्षांकरिता नव्याने विकसित करावयाच्या मोठ्या / मुख्य रस्त्यांच्या कामाकरिता जे फूटपाथ विकसित करण्यात येणार आहेत फक्त त्याच ठिकाणी पेवर ब्लॉक बसविण्यात यावेत, इतर भांडवली तसेच महसुली कामांच्या अंदाजपत्रकामध्ये पेवर ब्लॉक ही बाब अंतर्भूत करण्यात येऊ नये तसेच पेवर ब्लॉक या बाबीवर करण्यात येणारा खर्च थांबविण्यात यावा, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात यावे. सदरबाबत प्रभागस्तरावर योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आदेश मा. आयुक्त तथा प्रशासक यांनी दिले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!