Google Ad
Editor Choice

अतिक्रमण कारवाई करण्यापुर्वी हाॅकर्स झोनची निर्मिती करावी – पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० मार्च) : पिंपरी चिंचवड महापालिका अतिक्रमण विभागाकडून दापोडी, फुगेवाडी, कासरवाडी येथे महापालिकेच्या वतीने गोरगरीब दुकानदार,पथारीधारक व व्यवसायिक वर्ग यांच्यावर सर्रासपणे हिटलरशाही पद्धतीने अतिक्रमण कारवाई सुरू आहे.

एकीकडे कोरोना काळात आपले उद्योगधंदे गमावलेले गोरगरीब नागरिक छोटा-मोठा व्यवसाय असो वा भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असताना महापालिकेच्यावतीने यांच्यावर हिटलरशाही पद्धतीने कारवाई सुरू आहे तरी कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने सर्वांची अधिकृत नोंदणी करून हॉकर्स झोनची निर्मिती करावी व त्यानंतरच अवैध व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी श्री.निलेश हाके यांनी ‘ह’ क्षेत्रिय अधिकारी थोरात यांच्याकडे केली.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!