Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरीकांनी दिव्यांग सर्वेक्षण लवकरात लवकर करून घेण्याचे मनपाचे आवाहन

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.०८ ऑगस्ट २०२२) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत, दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणेत येतात. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय क्र.दिव्यांग २०२१/प्र.क्र.४५/दि.क.२ दि.२/१२/२०२१ नुसार दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी व वैश्र्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविणे बाबत कळविणेत आलेले होते.

त्यानुसार प्लेक्स, पॅम्पलेट, व्हॉटसअप व फेसबुक मेसेज, बॅनर, ऑडीओ, व्हीडीओ सी.डी., मनपाच्या डिजीटल जाहिरात फलकावर तसेच विविध माध्यमाद्वारे व्यापक प्रसिध्दी देणेत आलेली होती.

समाज ‍विकास विभागाकडून दि.१०/५/२०२२ ते दि.१५/०६/२०२२ पर्यंत दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करणे, वैश्विक ओळखपत्र (UDID), दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र नोंदणी करणे इ.बाबत शिबीर आयोजित करणेत आलेले होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिव्यांग व्यक्तींची एकूण ८०६० एवढी लोकसंख्या आहे त्यापैकी आज अखेरपर्यंत ३१०० इतक्याच व्यक्तींनी दिव्यांग सर्वेक्षण केलेचे दिसून येत आहे.

समाज ‍विकास विभागाकडून जाहीर आवाहन करणेत येत आहे की दि.३१/०८/२०२२ पर्यंत उर्वरीत दिव्यांग नागरीकांनी दिव्यांग सर्वेक्षण केले नाही तर त्यांचे देण्यात येणारे आर्थिक लाभ बंद करणेत येईल याची नोंद घ्यावी.

तरी दिव्यांग नागरीकांनी आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जावून दिव्यांग सर्वेक्षण लवकरात लवकर करून घेणेत यावे असे आवाहन समाज विकास विभाग दिव्यांग कक्षाचे वतीने करणेत येत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago