Google Ad
Editor Choice Education

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश … १ ली ते ७ वीच्या सर्व शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० नोव्हेंबर) : जगभरात कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉन ( Omicron ) आढळून आला असून व जागतिक आरोग्य संघटना ( W.H.O. ) ने सदर विषाणू प्रकारास Variant Of Concern म्हणून जाहीर केले आहे . सदर विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यास्तव या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे .

पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड १९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत .

Google Ad

▶️काय आहेत आदेश :-
१ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ . १ ली ते इ . ७ वी चे वर्ग सुरु करण्यास १५ डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात येत आहे . कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन इ . १ ली ते इ . ७ वी चे वर्ग सुरु करणेबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील . पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इ . १ ली ते इ . ७ वी चे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद राहतील . मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील .

२ ) संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे / मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० , तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील . सदर आदेश दि . ०१.१२.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील असे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!