Google Ad
Editor Choice Pune

पालकमंत्र्यांच्या बैठकीत पिंपरी चिंचवडच्या महापौरांनी केली कोविड प्रतिबंधक लसींची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक १६ जुलै २०२१) : पिंपरी चिंचवड शहराने कोरोना मुक्तीचा संकल्प केला असून त्यासाठी नागरिकांचे लसीकरणावर विशेष भर दिलेला आहे. तथापि अपु-या लसींच्या पुरवठ्यामुळे लसीकरणात वारंवार अडथळा निर्माण होत आहे. त्याबाबत शहराला मुबलक लसींचा पुरवठा करण्याची विनंती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार यांचेकडे केली.

 

Google Ad

विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे पालकमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली कोरोना-१९ चे अनुषंगाने करणेत येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विनंती केली. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे तसेच पुणे जिल्हयातील खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे यांचेसह पिंपरी चिंचवड व पुणे महापालिका आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहराने कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम अत्यंत प्रभावीपणे राबविलेली असून जेष्ठ नागरिक, दुर्धर आजाराने त्रस्त व्यक्ती, विविध वयोगटांमधील नागरिकांना, फ्रंटलाईन वर्कर, पत्रकार, परदेशी जाणारे विद्यार्थी, वैद्यकीय व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्राधान्याने लसीकरण केल्याने कोरोना रुग्णांची संख्या घटलेली आहे. तथापि संपूर्णपणे नागरिकांचे लसीकरण करण्याकरिता उपलब्ध असलेली लस पुणे शहराच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत वारंवार अडथळा निर्माण होत असल्याचे मत महापौर माई ढोरे यांनी व्यक्त केले.

कोरोना संसर्गाची तिसरी संभाव्य लाट येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांचे अंदाजानुसार कोरोना बाधितांची संख्या वाढणार असल्याचे समजते. याबाबत शहर कोरोनामुक्त करण्यासाठी तसेच कोविड लसीकरण मोहिम सुरळीतपणे चालू राहण्यासाठी मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी मागणीही महापौर माई ढोरे यांनी केली. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महापौर माई ढोरे यांची पिंपरी चिंचवड शहराच्या लसीकरणासाठी केलेल्या लसींची मागणी रास्त असून लसींचे डोस पुरविण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे बैठकीत सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!