Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाची महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद … वैद्यकीय सहाय्य योजना पुन्हा सुरू करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांकडे मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० सप्टेंबर) : पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापौर निधीतून गोरगरीब रुग्णांना देण्यात येणारी आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. हा शहरातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांवरील अन्याय आहे. महापौर नाहीत म्हणून महापौर निधीऐवजी अन्य मार्गाने गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत देण्याचा पर्याय प्रशासनाने काढायला हवा होता. पण तसे झालेले नाही. प्रशासन अजूनही गाढ झोपेतच आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही “शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना” लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शहरातील गोरगरीब व गरजू रुग्णांच्या औषधोपचारासाठी, मानवनिर्मित आपत्तीसमयी पीडितांना अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने ४ सप्टेंबर १९९९ रोजी धर्मदाय आयुक्तांकडे पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरीटेबल ट्रस्ट या नोंदणीकृत असलेल्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या वतीने शहरातील रुग्णालयात दाखल असलेल्या गरीब व गरजू नागरिकांना महापौर निधीतून हृदय शस्त्रक्रिया, किडनी, डायलेसिस, कर्करोग, मेंदूचे आजार, अपघातग्रस्त आणि इतर मोठया शस्त्रक्रियांसाठी पाच हजार रुपयांची तुटपुंजी वैद्यकीय मदत देऊन संबंधित रुग्णांना थोडासा दिलासा दिला जातो. परंतु, महापालिकेची मुदत संपल्यानंतर निवडणूक न झाल्याने प्रशासकाची नियुक्ती झाली. त्यानंतर महापौर निधीतून रुग्णांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीची योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक मदतीची गरज असलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महापौर नाहीत म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्ग शोधण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवाने तसे झालेले नाही.

पुणे महापालिका त्यांच्या हद्दीतील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ‘शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवते. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये सवलतीच्या दरात उपचार मिळतात. खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी महापालिकेकडून एक लाख रूपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते. योजनेच्या लाभार्थ्यांना पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील प्राधिकृत केलेल्या खासगी दवाखान्यांमध्ये आंतररुग्ण विभागातील केवळ जनरल वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्यांनाच आर्थिक लाभ दिला जातो. निमसरकारी, खासगी व डिलक्स रूम घेणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरपत्रकानुसार आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी लाभार्थ्याला महापालिकेतून उपचारासाठीच्या एकूण खर्चामध्ये ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी हमीपत्र घ्यावे लागते. हे हमीपत्र घेऊन खासगी रुग्णालयात दिल्यानंतर एकूण रकमेच्या केवळ ५० टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागते. उर्वरित ५० टक्के रक्कम (जास्तीत जास्त एक लाख रुपये) महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संबंधित रुग्णालयाला अदा करण्यात येते.

पुणे महापालिकेची शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यंत चांगली आहे. या योजनेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्वांगिण अभ्यास करावा. या योजनेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी अटी व शर्तीसह परिपूर्ण वैद्यकीय सहाय्य योजना तत्काळ सुरू करण्याची आपण कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

21 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago