“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” … नवरात्रनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेचा महिलांच्या आरोग्यासाठी पुढाकार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ सप्टेंबर , २०२२) : मा . मंत्री , सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण , महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सुचनेनुसार , राज्यात व जिल्ह्यातील १८ वर्ष वयोगटावरील सर्व महिला , माता , गरोदर महिला यांची सर्वांगीण तपासणीसाठी दि . २६ सप्टेंबर , २०२२ रोजी पासून नवरात्र उत्सवात ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे व तशा सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राप्त आहेत त्यानुसार ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ या मोहिमेचा शुभारंभ दि . २७ सप्टेंबर , २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालय येथे संपन्न होणार आहे .

या मोहिमेची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय / दवाखान्यामध्ये कार्यरत आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , आशा स्वयंसेविका , अंगणवाडी सेविका इत्यादींमार्फत घरोघरी माहिती देण्यात येणार आहे . या निमित्ताने नवरात्रोत्सवात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील १८ वर्षावरील युवती , गरोदर महिला मातांची तपासणी करण्यात येणार आहे . ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अशी संकल्पना घेऊन विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय स्तरावर राबविण्यात येणारी विविध आरोग्य शिबिरे व उपक्रमांतर्गत युवती गरोदर महिला आणि मातांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत .

या उपक्रमात महानगरपालिका रुग्णालय स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची वैद्यकीय अधिकारी स्वतः तपासणी करतील व आजारी महिलांना आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येईल . तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्णालय झोन अंतर्गत तपसणी शिबिरे घेण्यात येणार असुन आजारी माता व महिलांना मनपाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरीता संदर्भित करण्यात येईल . यादरम्यान नवविवाहित महिलावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे . सोनोग्राफी तपासणी आणि कुटुंब कल्याण बाबत ही समुपदेशन करण्यात येणार आहे .

तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सर्व माता व महिलांना अवाहन करण्यात येते की , ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ‘ या अभियानांतर्गत दि . २७ सप्टेंबर २०२२ ते दि .५ ऑक्टोबर , २०२२ या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयांतर्गत तसेच रुग्णालय कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

3 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

3 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago