Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पिंपरी – चिंचवड मधील पिंपळे निलख भागात हातात धारदार शस्त्र घेऊन गुंडांची भर रस्त्यात दहशत … वाहनचालकांना मारहाणीचा प्रयत्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जुलै) : पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. सांगवी परिसरातील पिंपळे-निलख भागात रविवारी रात्री दोन मद्यधुंद तरुणांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हातात धारदार शस्त्र नाचवत या तरुणांनी रस्त्यावरील जवळपास पन्नास वाहनांना अडवून मारहाणीचा प्रयत्न करत धमकी दिली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

प्राथमिक माहितीवरुन प्रतीक खरात आणि चेतन जावरे या दोन तरुणांनी हे कृत्य केल्याचं समजतंय. परंतु या अगोदर यांची गुंडगिरीची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याचे समजते. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींविरुद्ध एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि या तसेच घटनेचा तपास करण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

Google Ad

दोन्ही आरोपींनी रात्र भररस्त्यात केलेल्या प्रकारामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. संबंधित दोन्ही तरुण कोणत्याही टोळीशी संबंधित नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तसेच दारुच्या नशेमध्ये त्यांनी हे कृत्य केलं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोन्ही
हे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!