Google Ad
Editor Choice

विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत उमा खापरे यांच्या रुपाने … पिंपरी-चिंचवडला मिळाली पहिली महिला आमदार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जून) : विधानपरिषद निवडणुकीचे निकाल घोषित झाले असून या या निवडणुकीत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे खापरे या आता पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. एक ओबीसी चेहेरा म्हणून त्यांना संधी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत उमा खापरे या दोन वेळा नगसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. १९९७-२००२ या कालावधीत त्यांनी नगरसेविका म्हणून महापालिकेत काम केले आहे. उमा खापरे या गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ भाजपसोबत काम करत आहेत.

Google Ad

तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम केलेले आहे. भाजपच्या पुणे जिल्हा सरचिटणीस, महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा, महिला प्रदेशाध्यक्षा अशी विविध आणि महत्वाची पदेही त्यांनी भूषविली आहेत. आता त्या विधानपरिषदेत आमदार म्हणून काम करणार आहेत.राज्य सभेच्या निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपनेच बाजी मारल्याचे पहायला मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. तर, या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २-२ उमेदवार निवडून आले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना विजय झाला असून, काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे.

यावेळी बोलताना आमदार उमा खापरे म्हणाल्या, हा विजय भाजपचा आहे. हा विजय आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि मुक्ता टिळक यांचा आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!