Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहराचे विना – वाहन प्रवास धोरण ( NMT policy ) … महानगरपालिकेच्या सर्व अभियंत्यांना / अधिकाऱ्यांना दिले एक दिवसाचे प्रशिक्षण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहराचे विना – वाहन प्रवास धोरण ( NMT policy ) महानगरपालिकेच्या सर्व अभियंत्यांना / अधिकाऱ्यांना अवगत करणेसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण शनिवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित केले होते . या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्री . राजेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले . याप्रसंगी महापालिकेचे अति . आयुक्त श्री . विकास ढाकणे , शहर अभियंता श्री . राजन पाटील , सहशहर अभियंता श्रीकांत सवणे , मकरंद निकम , रामदास तांबे , सतीश इंगळे , अशोक भालकर , संजय कुलकर्णी , संदेश चव्हाण आणि नगररचना उपसंचालक श्री . नाळे व महापालिकेतील सर्व अभियंते / अधिकारी उपस्थित होते .

आज आपण प्रचंड वेगाने वाढणाऱ्या शहरीकरण व नागरीकरणामुळे हवा आणि आवाजाच्या प्रदूषणाने ग्रस्त झालेलो आहोत . पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहनसंख्या हि लोकसंखेइतकी किंवा त्यापेक्षा जास्त झालेली दिसते . त्याचा परिणाम सर्वत्र वाहतूककोंडी व वायुप्रदूषणामुळे अनेक प्रश्न समस्या नागरी भागात दिसतात . अशा समस्या कमी करणेसाठी आता आपण आपल्या छोट्या / कमी अंतराच्या प्रवासासाठी पायी चालणे किंवा सायकलचा वापर करणे हे शहराच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक झालेले आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त श्री . राजेश पाटील यांनी केले .

Google Ad

आजच्या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शहरातील नागरिकांना सलगपणे विना अडथळा चालता येईल असे उज्च दर्जाचे पदपथ व सायकल मार्ग सुरक्षितपणे वापरणे तसेच शक्यतो नागरीक आपला जवळचा / कमी अंतराचा प्रवास नक्कीच पायी चालणे / सायकलीने करतील हा आहे . पिंपरी चिंचवड शहराच्या विना – वाहन प्रवास धोरणास माहे सप्टेंबर २०२१ च्या मा . महापालिका सभेमध्ये मंजुरी मिळालेली असून आता त्याची अंमलबजावणी करणेसाठी सर्व अभियंत्यांना व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना हे धोरण अवगत करणे आणि त्यांचा याबाबतचा दृष्टीकोन अधिक प्रगल्भ करणे आवश्यक असल्याचे शहर अभियंता श्री . राजन पाटील यांनी सांगितले . सदर धोरणातील सर्व टप्पे विस्तृतपणे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सादरीकरण करून स्पष्ट केले .

शाश्वत नागरी प्रवासासाठी बहु पर्यायी प्रवाशी साधनांचा उत्तम वापर कसा करता येईल याबाबतच्या अनेक महत्वाच्या बाबीवर त्या – त्या क्षेत्रातील तज्ञांनी सविस्तर माहिती दिली व त्याचा यथोचित वापर सर्व अभियंते / निर्णय घेणारे अधिका – यानी करावा असे सांगितले . कोणत्याही शहरी रस्याचे डिझाईन हे रस्त्याचा प्रकार , त्याचा वापर , तो ज्या भागातून जातो त्याच्या आज बाजूचा जमीन वापर आणि तेथील नागरिकांच्या गरजा व सहभाग नोंदवून तयार केले पाहिजे असे प्रांजली देशपांडे- आगाशे , संस्कृती मेनन , प्रा . प्रसन्ना देसाई व विकास ठाकर यांनी आपापल्या सादरीकरणाद्वारे उदाहरणासह पटवून दिले . या प्रशिक्षणास पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व विभागातील ४५० पेक्षा जास्त अभियंते / अधिकारी उपस्थित होते .

सदरचे एक दिवसाचे विना वाहन प्रवास धोरण ( NMT policy ) प्रशिक्षण यशस्वी करणेसाठी आशिक जैन , प्रांजल कुलकर्णी , I TDP पुणे , प्रताप भोसले , प्रमोद ओभांसे व बापूसाहेब गायकवाड , सुरेखा कुलकर्णी , सुनील पवार , संतोष कुदळे , यांनी प्रयत्न केले . प्रशिक्षणातील शेवटच्या सत्रात अभियंत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे वरील तज्ञांनी दिली . तदनंतर महापालिका आयुक्त श्री . राजेश पाटील यांच्यासह याप्रसंगी उपस्थित असलेले महापालिकेचे अति आयुक्त श्री . विकास ढाकणे , शहर अभियंता श्री . राजन पाटील , सर्व सहशहर अभियंता आणि उपसंचालक श्री . नाळे व महापालिकेतील सर्व अभियंते / अधिकारी यांचे आभार मानून बापूसाहेब गायकवाड , कार्यकारी अभियंता यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!