पिंपरी चिंचवड शहर सलुन व्यावसायिकांना ७ दिवसांच्या लॉकडाऊन नियमाममधुन वगळावे … महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर संघटना नाभिक समाजाच्या विविध विषयांवरील समस्या सोडविण्याचे काम करत असते . पिंपरी चिंचवड शहरात सात दिवस होणाऱ्या मिनी लॉकडाऊन मधून आम्हाला वगळावे असे निवेदन महामंडळाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले, यात म्हटले आहे, की आपण दिलेल्या दि . २/४/२०२१ च्या जी . आर . मध्ये आपण सलुन व पार्लर व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापना बंद करण्यासाठी निर्देश दिले आहेत .

सामान्य सलुन व्यवसाय जो फक्त दाढी व कटिंग करुन रोज आपले पोट भरत असतो . असा सामान्य व्यावसायीकांना त्यांचे व्यवसाय बंद करण्यास सांगुन त्यांच्यावर अन्याय होत आहे . त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल . तसेच पिंपरी चिंचवड शहरातील ९ ० % सलुन व्यावसायिकांची दुकाने व घरे सुध्दा भाडेतत्वावर आहेत . कित्येक व्यायसायिकांनी कर्जे घेवून आपली दुकाने चालु केली आहेत . या सर्वांवर लॉकडाऊनमुळे खुप मोठे संकट येईल . याचा मा . आयुक्त साो . यांनी विचार करावा .

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

पुणे शहरामध्ये रुग्णसंख्या जास्त असुनही तेथील सलून व्यवसाय चालु आहे . आम्ही पालिकेने दिलेल्या सर्व कोविड संदर्भीय नियमांचे पालन करुन व्यवसाय करीत होतो व आताही करत राहु . परंतु आम्हांला व्यवसाय बंद करण्यास सांगु नये . ही विनंती करणारे निवेदन आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.

आमचे व्यवसाय चालु ठेवण्यास परवानगी नाही मिळाली तर आम्हांला आंदोलन करण्यावाचून काही उपाय राहणार नाही . याची शासनाने नोंद घ्यावी . असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ८ रुग्णालये व ३५ दवाखाने यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १ जून २०२४ :- महाराष्ट्र राज्य शासनच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील…

23 hours ago

कर संकलन विभागाची ट्वेंटी ट्वेंटी स्टाईल ‘बॅटिंग’; 60 दिवसांत 300 कोटी वसूल! पावणेतीन लाख मालमत्ता धारकांनी भरला कर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ जून : पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाचीट्वेंटी…

1 day ago

गुरुवार ३० मे रोजी पिंपरी चिंचवड शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ मे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडील पाणीपुरवठा विभागाच्या से.क्र. २३ निगडी…

5 days ago

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

1 week ago