Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर मनसेचा कोकण पुरग्रस्तांना एक हात मदतीचा , कर्तव्याचा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ऑगस्ट) : राज ठाकरे यांच्या हाकेला साद देत शनिवारी दि. ०६ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने कोकण पुरग्रस्तांना मदत करण्यात आली. प्रामुख्याने पुरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु भांडी, अंन्नधान्य, साड्या, औषधे, गुडनाईट/मॉर्टिन कॉइल, बिस्किटे, बिसलेरी पाणी, फिनेल, साबन याचा समावेश होता.

पिंपरी चिंचवड शहर मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी मधील खेड तालुक्यातील कुंभार वाडा आणि ब्राम्हण आळी तसेच चिपळूण तालुक्यातील चारगाव खांदाट, भोईवाडी,दळवटणे बागवाडी, इंगवलेवाडी,खेर्डी एम.आय.डि.सी. मफतलाल चाळ, खेर्डी मोहल्ला, खेर्डी सुर्वे चाळ या ठिकाणी वाटप करण्यात आले व पुरग्रस्त विविध भागातील पाहणी केली.

Google Ad

त्या प्रसंगी राजू सावळे, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सचिन मिरपगार, तेजस दाते, सुरज जाधव, नितिन शिंदे, अविनाश तरडे, स्वप्निल महांगरे, प्रवीण माळी, निलेश ननावरे, भरत क्षेत्रे, आकाश जाधव, नारायण पठारे, निलेश पवार, रोहिदास शिवनेकर, मंगेश भालेकर, सतीष सामनगावे, समाधान केंद्रे, अविनाश एकंबे, श्रावण गोयल, श्रद्धा देशमुख, सोनाली गावडे, अभिषेक गावडे, सुभाष पाटिल, विपुल काळभोर, ओंकार काळभोर, रोहित भोकरे, जय सकट, प्रदीप घोड़के , प्रविण सोलंकी हे सर्व मदत करण्यासाठी उपस्थित होते.

हि सर्व आपण दिलेली मदत आम्ही मनसैनिकांनी योग्य ठिकाणी वाड्या,वस्त्यांवर पूरग्रस्तांच्या पर्यत पोहोचवली आपण केलेल्या सहकार्य व मदत कार्याबद्दल सर्वाचे
राजू सावळे यांनी सर्वांना धन्यवाद दिले आणि आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!