महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ सप्टेंबर) : मराठी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा बांधवांनी उपोषणाला बसत पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना येथील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शांततेच्या व कायदेशीर मार्गाने आंदोलनाला बसलेल्या महिला भगिनी, लहान मुले व वयोवृद्धांवर जो अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी निषेध करण्यात आला. मराठा समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आणि अनेक शहरांत बंद पुकारण्यात आला होता.
असे असतांना देखील सरकारने अद्यापही मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेपर्यंत आम्ही जाग्यावरून उठणार नाही असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांना पाठबळ मिळावे व त्यांना पाठींबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना निगडी येथील भक्ती शक्ती शिल्पास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून सतीश काळे व अनेक समन्वयक गुरुवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पिंपरी येथे उपोषणास बसले आहेत.
सतीश काळे यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जाधव, लहू लांडगे, जीवन बोराडे, नकुल भोईर, अभिषेक म्हसे, सागर तापकीर, लक्ष्मण रानवडे, वैभव जाधव, सुनिता शिंदे, गोपाळ मोरे, रविशंकर उबाळे, सुनील शिंदे, लक्ष्मण पांचाळ, दिपक कांबळे, योगेश पाटील, निलेश शिंदे, स्वप्निल परांडे, प्रविण कदम, वचिष्ठ आवटे, वासुदेव काटे पाटिल, अमोल निकम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत. यावेळी उपोषण करत्याना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास कदम तसेच राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी भेटून मराठा समाजाच्या मागण्यास पाठिंबा दिला आहे.