Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. उज्वलाताई गणेश गावडे यांनी केले … प्रभागातील सर्व महिला भगिनींकरिता नागपंचमीनिमित्त मंगळागौर आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑगस्ट) : चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. उज्वलाताई गणेश गावडे यांच्या मार्फत शनिवार दिनांक ३०/०७/२०२२ रोजी प्रभागातील सर्व महिला भगिनींकरिता नागपंचमीनिमित्त मंगळागौर आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जागृती कलामांचाच्या वतीने सांस्कृतिक खेळ, प्रश्नमंजुषा, उखाणे स्पर्धा असे रोचक खेळ घेण्यात आले त्याचबरोबर महिलांना आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या.

Google Ad

सदर कार्यक्रमास प्रभागातील हजारो महिलांचा व मुलींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कार्यक्रम चांगलाच रंगला होता आपली मराठी संस्कृती आणि परंपरची नवीन पिढीला ओळख राहिली पाहिजे या हेतूने हा कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून घेण्यात येत आहे. नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्यामुळे यापुढेही आपण नागरिकांसाठी असेच नवनवीन उपक्रम राबवत राहू असे महिला मोर्चा अध्यक्षा सौ. उज्वलाताई गावडे यांनी यावेळी व्यक्त केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!