Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शहरात “प्लाझ्मादान” मोहिमेस प्रारंभ!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार आमदार महेश लांडगे तसेच चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर यांच्यावतीने आज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भाजपा अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत “प्लाझ्मादान” अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहराचे सरचिटणीस स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी स्वतः प्लाझ्मादान करून अभियानाला सुरुवात केली.

प्लाझ्मादान अभियानात प्रामुख्याने प्रसाद कस्पटे, गणेश जवळकर, शिवराज लांडगे, रवी जांभुळकर, उदय गायकवाड, मंगेश धाडगे यांनी पुढाकार घेऊन हे अभियान यशस्वी केले. तसेच शहरातील ईतर ठिकाणी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते, प्रदेश उपाध्यक्ष व युवा वॉरियर्स चे संयोजक अनुपदादा मोरे यांनी प्राधिकरण येथे व भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे यांनी कस्पटे वस्ती वाकड येथे रक्तदान शिबीर घेऊन जवळपास ५० बाटली रक्त संकलन केले.

Google Ad

आज या अभियानाला आमदार महेश लांडगे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश यादव, गणेश जवळकर, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, प्रसाद कस्पटे, पुजा आल्हाट, चिटणीस रवी जांभुळकर, प्रकाश चौधरी, मुक्ता गोसावी, मंडल अध्यक्ष उदय गायकवाड, सागर घोरपडे, सारिका माळी यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

❣️ युवा घरोघरी, रक्तदान दारोदारी ❣️

✅ SuperHero –  Be a Savior

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!